Saturday, July 25, 2015

 

आमच्या "तीन देविया"

                   आमच्या "तीन देविया"

आम्ही त्याना आमच्या "तीन देविया" असे म्हणत असो- ताई, मावशी, आणि मामी. त्या आमच्या परिवारातल्या मोठ्या. कुठलाही कार्यक्रम असो त्या तीघी नेहमी हजर असत; नव्हे त्या तीघी हजर पाहिजेतच! कोणी एक आली नाही तर चुकल्या सारखे वाटायचे.
त्या सुद्धा एकमेकीच्या सहवासात खूश असायच्या. आणि एकत्र येण्याचे प्रयत्न चालू असायचे. "यंदा दिवाळी चिपळूण मध्ये करूया" (ताई). "नाही नाही तुम्ही कोल्हपुरला येऊन किती दिवस झाले, कोल्हपुरलाच करूया" (मामी). "मग गुहागरला कधी येणार आमच्याकडे राहायला?" (मावशी). असे वाद-विवाद चालायचे आणि शेवटी निर्णय व्हायचा.
बायकांच्या बरोबर पुरूषांमध्ये सुधा चांगली दोस्ती होती! पुरुषांना सोपे होते, जवळ यायला संध्याकाळचे दोन पेग  आपले काम करायचे!
बायकांसाठी जुळवून घेणे एवढ सहज नसत. पण ह्याना तसा प्रॉब्लेम नव्हता. ताई आणि मावशी तर बहिणीच होत्या; मामी सुद्धा कोकणातली! तेव्हा त्या एकमेकिंमध्ये एक सहजता होती. त्या संध्याकाळी ग्लास घेऊन बसत नसत पण त्याना आपले स्वयंपाक व विविध पक्वान्न आपल्या पतिराजाना करून घालण्यात खूप रस. तसेच परिवार व नातेवाईकांची पण चन्गळ असायची. तीघीही मोठ्या सुगरणी!
ताई आणि मावशीना तर पाककला तज्ञच म्हणायचे. त्यांचे उकडीचे मोदक, डाळिंब्यांची उसळ, पुराणाच्या पोळ्या - इन फॅक्ट कोकणातला कुठ्चाहि पदार्थ असो, त्यांच्या हातात जादुच होती!
मामी सुद्धा आपल्या परीने एक्सपर्ट होती; तिचा पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, व भाकरी - अमेज़िंग!
त्यांचा वेळ व काळ फार वेगळा होता. त्यांचा जन्म १९३० व १९४० मधला. त्या काळात मुलींच शिक्षण म्हणजे त्याना घर कामात निपुण बनवणे हाच प्रत्येक आईचा उद्देश्य असायचा. आणि ताई व मावशी अतिउत्तम ग्रुहिणि तर होत्याच त्याच बरोबर देखण्या! गोर्या व घार्या, स्पेशल कॉंबिनेशन! त्यात कॉन्फिडेन्स आणि जाणीव विलक्षण! आजच्या कोणत्याही स्त्रीला आव्हान देण्याजोगे!
तारुण्याचा जोश वयानुसार थोडा मावळला पण आपल्या घरावरचा कंट्रोल व व्यवस्थापन कायम आहे. अजूनही त्या कुठच्याही कंपनीच्या सी.ए.ओ बनू शकतात व कुठच्याही .एम.बि.ए. ला लाजवु शकतात. आश्चर्याची गोष्ट नाही की घरातले पुरूष सुद्धा त्यांच्यावर अवलंबून असत.
सर्वात शक्तिमान मावशी! ती जणू गुहागरची सूपर वुमन! गुहागरमध्ये जणू तीचच रज्य! तिच्या ओळखी सर्वत्र. तिचा लोकसंपर्क दांडगा. काम काहीही असो, घरी बसल्या मावशीच्या एका फोन कॉल च्या जोरावर होऊ शकत. तुमच्या गाडीची दुरुस्ती असो, तिच्या भाच्यांसाठी चिकन बिर्यणि असो, व्यवस्था करण्यात मावशी एक्सपर्ट. मी स्वतः अनेकदा अनुभव घेतलाय. आणि तीच्या सुंदर समुद्राकाठ्च्या घरी कोण गेल नाही? नातेवाईक, मित्र, मित्रांचे मित्र, सगळे तिचा पाहुण्चार घ्यायला मागे बघत नाहीत आणि ती ही तित्क्याच उत्साहानी सगळ्यांच करत असते! 
मामीचा स्वभाव शांत व मवाळ, दोघींच्या विरुद्ध. ती मनानी खेड्यातलीच राहिली, घराची सून! अर्थात कोल्हापुरात राहून खूप शिकली; व खूप आक्टिव होती! करवीर भगिनी मंडळाच कामकाज बघायची, बॅडमिंटन, रमी, इत्यादी खेळ, अश्या बर्याच गोष्टींमध्ये मन रमवायची; मामा बराच वेळ पुण्यात असायचे!
आम्ही दोघ, व त्यांच्यामध्ये खूप सख्य होत. त्यांची मुंबईला आमच्याकडे यायची आम्ही नेहेमी वाट बघायचो. पूजा, सणवार, लग्न, काहीही कार्य असो, त्यांची उपस्थिती  हविच. त्यांचा अनुभव, व त्यांच्याकडे असलेली माहिती; ह्याचा उपयोग आम्हाला व्हायचाच; त्याचबरोबर मदत ही!
मला आणि माझ्या भावन्डाना तेच मोठे, त्यांचाच आधार होता; अम्मा, अण्णा गेल्या नंतर.
त्या वेळेला मामांचीच फक्त गाडी होती! त्या गाडीतून आम्ही सगळी फिरायला निघायचो! पांचगणी, महाबळेश्वर, गोआ, बेळगाव! किती जण त्यात कोंबायचो, पण मामानी कधी काचकूच केली नाही, त्यांची नेहमी तयारी असायची! मामांचा मोठेपणा!
जशी वर्ष गेली, पुरूष मंडळीनी ह्या जगाचा निरोप घेतला. सर्वात आधी मामा गेले (त्यांच हार्ट ऑपरेशन सक्सेस्फुल झाल नाही); मग अप्पा गेले (कॅन्सर); आणि शेवटी पपा (हेपटाइटिस सी जो त्याना १५ वर्षापूर्वी रक्त दिल्यामुळे झाला).
पुरूष आधी गेल्यामुळे बायका एकमेकांच्या सोबतीत जास्त राहू लागल्या. मामी अजून कोल्हापुरात अडकली होती; नातीची आणि मग पणतीची  देखभाल करत! पण ताई व मावशी एकट्याच असल्याने, खूपदा एकत्र राहायच्या; कधी चिपळूण कधी गुहागरला.
गेल्या महिन्यात ताई आम्हाला सोडून गेली. शेवट शांत व खूप काही वेदना झाल्या नाही, तरी ६ महिने त्या मुंबईला राहिल्या, त्याना ते त्रासाचेच होते. ह्या आधी त्यांच्या ८७ वर्षात त्या कोणावर अवलंबून राहिल्या नाहीत, नेहेमी स्वतंत्रपणी राहिल्या. त्यामुळे शेवटचे ३ महिने त्यांची ढासळती प्रकृती आम्हाला सुद्धा बघवत नव्हती. देवाच्या कृपेने काही कॉंप्लिकेशन्स झाल्या नाहीत; वेदना झाल्या नाहीत; त्या शेवट पर्यंत कंफर्टबल होत्या. ताईची देखभाल करणारी  बाई पण नशिबानी चांगली मिळाली. ताईची छान काळजी घ्यायची. आम्हाला सुद्धा हायस वाटल. ताईची स्वछ्ता म्हण्जे स्पेशल होत! मी विनोद करायचे - ताईला महिन्याला १ किलो टॅल्कम पाउडर लागते!
शेवटच्या दिवसात सुद्धा बाईला सूचना होती: माझे कपडे डेटोल घालून धू, आंघोळीच्या पाण्यात कोलोन वॉटर टाक, अंगाला पाउडर लाव, कपडे दिवसातून दोनदा बदल, केस विंचर, इत्यादी!
ती जगली आपल्या अटी वर, शेवटच्या दिवसात सुद्धा आपला सगळा परिवार जवळ होता, तीनही मुल जवळ होती. सगळे नातेवाईक भेटून गेले, तिच्या सगळ्या मैत्रिणी भेटून गेल्या; ती सुद्धा खुशीत असायची, व आम्हाला पण बर वाटायच.
मावशीची सर्वात जास्त मदत झाली; जेव्हा जेव्हा आम्ही बोलावल ती हजर असायची! आम्हाला तिचा खूप आधार वाटायचा.
ताई नसण्याच दुःख सर्वाधिक तिलाच होईल! तिला चुकल्या सारख होईल!
अर्थात दिलीपनी तिला सांगितल की "आता ताईच्या जागी तूच आहेस"! तसेच आम्ही सुद्धा मावशी व मामी करता आहोतच!
ताईच्या जाण्यानी एक पर्व संपल!









                








<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?